Ad will apear here
Next
प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश नोंदणीसाठी विशेष फेरी
सोलापूर : शैक्षणिक वर्ष २०१७-१८मध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता १९ ते २० जुलैपर्यंत सुविधा केंद्रावर नोंदणी करण्यासाठी विशेष फेरी जाहीर करण्यात आली आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली नसेल, अशा विद्यार्थ्यांना आपली नोंदणी नव्याने करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या फेरीमध्ये नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना केंद्रिभूत प्रवेश पद्धतीद्वारे प्रवेश दिला जाणार आहे. या फेरीची स्वतंत्र गुणवत्ता यादी २० जुलै रोजी सायंकाळी आठ वाजता तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वेबसाइटवर प्रसिध्द होणार आहे. या यादीतील नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन ऑप्शन फार्म २२ जुलैपर्यंत भरावयाचे आहेत.

त्याचप्रमाणे शैक्षणिक वर्ष २०१७-१८मध्ये थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता सुविधा केंद्रावर नोंदणी करण्यासाठी २३ जुलैपर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे.

‘या फेरीद्वारे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारच्या सर्व मागासवर्गीय जातीच्या शिष्यवृत्त्या, ईबीसी सवलत मिळणार आहे. या सुवर्णसंधीचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, तसेच ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली नसेल अशा विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी सुविधा केंद्रावर जाऊन कन्फर्म करून घ्यावी. सुविधा केंद्र रविवारीही सुरू राहील,’ असे आवाहन एन. के. ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. दफेदार यांनी केले आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZGUBE
Similar Posts
अभियांत्रिकी पदवी प्रवेश स्वीकृती प्रक्रियेस एक दिवस मुदतवाढ सोलापूर : प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी प्रवेशाच्या पहिल्या फेरीतील जागावाटप तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वेबसाइटवर २८ जून रोजी प्रसिद्ध झाले आहे.  पहिल्या फेरीतील जागांच्या वाटपानुसार विद्यार्थ्यांनी जागा स्वीकारण्यासाठी प्रवेश स्वीकृती केंद्रावर (गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निक, सोलापूर) जाऊन प्रवेशाबाबतची
सोलापुरात ड्रोन कार्यशाळेचे आयोजन सोलापूर : ड्रोन म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येते ते एक मोठे यंत्र आणि त्याद्वारे करण्यात येणारी फोटोग्राफी पण आपल्या तळहातावर बसतील एवढे नॅनो ड्रोन तयार कसे करता येतील या विषयावर एन. के. ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागामार्फत व मुंबई आयआयटीच्या द्रोणा एव्हिएशन
ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे यश सोलापूर :  किर्लोस्कर वसुंधरा आंतररष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एन. के. ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाने पीपीटी प्रेजेंटेशनमध्ये प्रथम क्रमांक, पथनाट्य स्पर्धा प्रकारात द्वितीय क्रमांक व प्रश्न मंजुशामध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला. या महोत्सवांतर्गत किर्लोस्कर समूहातर्फे पर्यावरणासंबधी जनजागृती करणारे विविध कार्यक्रम राबवण्यात आले
सृजनरंग नियतकालिक स्पर्धेत ‘ऑर्किड ऑरा’ सर्वप्रथम सोलापूर : सोलापूर विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या सृजनरंग व्यावसायिक नियतकालिक स्पर्धेत एन. के. ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘ऑर्किड ऑरा २०१७’ला सर्वोत्कृष्ट नियतकालिक म्हणून गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा व विद्यार्थ्यांमधील लेखक चिरंतन रहावा, यासाठी महाविद्यालय

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language